सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपीचे डेप्युटी सीईओ इशाधीन शेळकंदे यांना सरपंच परिषदेचा पुरस्कार

उत्तम प्रशासक म्हणून सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन केला गौरव

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांना सरपंच परिषदेने ‘उत्तम प्रशासक” म्हणून सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आहे.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी आतापर्यंत केलेल्या सेवेची दखल घेऊन हा सन्मान केला आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सुनील शेळके, आमदार अभिमन्यू पवार, आमदार कृष्णा गजबे, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थित झालेल्या शानदार कार्यक्रमात शेळकंदे  यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, उपाध्यक्ष  विकास जाधव, प्रदेश सरचिटणीस राजू पोतनीस आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेळकंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा ध्यास घेऊन वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवून ग्रामीण भागातील जनतेला विकास योजनेचा लाभ दिला. पंढरपूर येथे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्तीस असताना आषाढी एकादशीच्या वेळेला वारकऱ्यांच्या सेवेसाठी चांगले नियोजन केले. त्यांच्या अशा विविध कामाची दखल घेऊन ‘ उत्तम प्रशासक” म्हणून सरपंच परिषदेने हा गौरव केला आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, अमोल जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button