सोलापूर : रामनवमीनिमित्त मंद्रूप येथील श्रीराम मंदिरात आयोध्याहून आणलेल्या शरयू नदीतील तीर्थाने प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला.
रामनवमीनिमित्त मंद्रूप येथील श्रीराम मंदिर ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी आयोध्याहुन आणलेल्या तीर्थाने ज्येष्ठ पत्रकार राजकुमार सारोळे व प्रा. पद्मिनी राजकुमार सारोळे यांच्याहस्ते अभिषेक व आरती करण्यात आली. पौरोहित्य ग्रामोपाध्ये यांनी केले. त्यानंतर वीरभद्र भजनी मंडळ व जय हनुमान भजनी मंडळाच्या पथकाने भजन सादर केले. दुपारी बारा वाजता पाळणा व गुलालाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास सरपंच अनिता कोरे यांच्यासह श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाचे सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टीचे अध्यक्ष जयंत देशपांडे सचिव अनिल कामतकर यांनी परिश्रम घेतले.