सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालयसंघटना-संस्था

पंढरपूरच्या पुरवठा निरीक्षकाविरुद्ध दिव्यांग संघटनेचीही तक्रार

सोलापूर : पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकाविरुद्ध कासेगावच्या दिव्यांग नागरिकांनी  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे तक्रार केली आहे.

कोव्हीडनंतर वाढत्या महागाईत केंद्र शासनाने नागरिकांना पुढील पाच वर्षा करिता मोफत धान्य योजना जाहीर केली आहे. हेच धान्य महागाईत गरजू वंचीताना मिळावं यासाठी अनेक गरजू लाभार्थी तहसील कार्यलयात रीतसर अर्ज दिल्यानंतर कार्यालयातून इष्टांक शिल्लक नाही असे सांगून त्यांना वारंवार फेऱ्या मारायला लावतात. पुरवठा विभागावर नियंत्रण ठेवणाऱ्या पंढरपूर पुरवठा निरीक्षकाने बाजारच मांडल्याच्या तक्रारी खासदार प्रणिती शिंदे यांच्या जनता दरबारात करण्यात आल्या. दिव्यांग असलेल्या गोरगरीबाचे अन्न सुरक्षा यादीत नाव समाविष्ठ करण्यासाठी चक्क दोन हजाराची मागणी होत असल्याबाबत तक्रार दिव्यांग नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन केली आहे. पंढरपूर तहसील कार्यालयातील  पुरवठा निरीक्षकाच्या कारभाराचा पाढाच या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला आहे. निवेदनातून चांगलेच वाभाडे काढले. याची दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तात्काळ कासेगाव ग्रामस्थांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ठ करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे प्रोटोकॉलच्या नावाने दुकानदाराची लुबाडणूक करणार्‍या पुरवठा निरीक्षकाचे मात्र पंचायत झाली आहे. पुरवठा निरीक्षकाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने जिल्हा पुरवठा निरीक्षकांनी त्यांच्यावर पुढील कार्यवाही केली नसल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button