सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

“या’ कारणामुळे सोलापुरातील शाळा पुढील वर्षी एक दिवस आधी सुरू होणार

जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या नागपंचमीची सुट्टी

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांची बुधवारी सोलापूर शहरात रॅली झाल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न  लक्षात घेऊन शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केली होती. पण आता शुक्रवार दि. 9 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. या सुट्टीमुळे  पुढील शैक्षणिक वर्ष एक दिवस आधी सुरू होणार आहे.

शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण आहे. ग्रामीण भागात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. महिलांसाठी हा सण महत्त्वाचा असल्याने विद्यार्थिनी या दिवशी शाळेला हजर राहत नाहीत. त्यामुळे या सणा दिवशी शाळांना सुट्टी द्यावी अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. शासनाने नवीन शैक्षणिक वर्षात आधीच सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. 76 सुट्ट्यांमध्ये उद्याची सुट्टी बसत नसल्याने प्राथमिक  शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शिक्षकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून 9 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील उर्दू माध्यम वगळून सर्व शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.  या सुट्टीमुळे पुढील शैक्षणिक वर्ष 15 जून ऐवजी 14 जूनला सुरू होईल असे त्यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. महिला शिक्षकांनाही आता हा सण आनंदाने साजरा करता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button