April 23, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

नवीन घरकुल यादीत तुमचे नाव आहे का? मग वाचा ही बातमी

सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत दिनांक २२ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी एका क्लिकवर 62967 घरकुल मंजुरीचे पत्र वितरण होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली..

पुढे माहिती देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले की सदरचा राज्यस्तरावरील मुख्य कार्यक्रम शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे असुन राज्यातील यात 20 लाख घरकुलांची मंजुरी पत्र व 10 लाख लाभार्थी यांना पहिला हप्ता वितरण पुणे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार असुन सदर कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे संचालक डॉ.राजाराम दिघे इ. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. तसेच जिल्हास्तरीय कार्यक्रम नियोजन भवन सात रस्ता सोलापूर येथे दुपारी 2 वाजता होणार असुन प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या 500 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व अनुदान देण्यात येणार आहे..तसेच त्याच दिवशी प्रत्येक तालुक्यात प्रातिनिधिक स्वरूपात 300 लाभार्थी यांना व ग्रामपंचायत स्तरावर उर्वरित सर्वच लाभार्थी यांना मंजुरी पत्र व अनुदान देण्यात येणार आहे..

सदर जिल्हास्तरीय कार्यक्रमास सर्व खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, सर्व विभागप्रमुख यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी सर्व लाभार्थी यांनी या घरकुल उत्सवासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे यांनी केले आहे.