सोलापूरजिल्हा परिषदपोलिस

बापरे… झेडपीच्या महिला स्वच्छतागृहात घुसला तरुण

सोलापूर : जिल्हा परिषदेत सोमवारी दुपारी तिसऱ्या मजल्यावरील महिला शौचालयात तरुण घुसल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी दोन तास प्रयत्न केल्यानंतर जे सत्य समोर आले त्यामुळे सर्वजणच बुचकाळ्यात पडले.

जिल्हा परिषदेतील मुख्य इमारतीत प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. सध्या हे पद रिक्त असल्यामुळे शिपाई काळे निवांत बसूनच होते. अशात सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोन महिला त्यांच्याजवळ आल्या व त्यांनी महिला स्वच्छतागृहात पुरुष घुसल्याची तक्रार केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काळे यांनी तात्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षासमोर गार्ड ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस शिपाई अर्चना पवार व त्यांचे सहकारी हवालदार धुमाळ यांच्याकडे धाव घेतली. त्यांना वरच्या मजल्यावर स्वच्छतागृहात तरुणाने प्रवेश केल्याचे सांगितले. त्यामुळे या दोघांनी तात्काळ तेथे धाव घेतली. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नव्याने कॅन्टीन बांधण्यात आले आहे या कॅन्टीन शेजारीच स्वच्छतागृह आहे त्या स्वच्छतागृहात तो तरुण घुसल्याचे त्या महिलांची तक्रार होती पोलिसांनी स्वच्छता ग्रहाचा दरवाजा ठोठावला पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही दरवाजा तर बंद होता दरवाजा उघडण्यासाठी उपस्थितांनी दरवाज्यावर लाथा घातल्या पण काहीच उपयोग झाला नाही पुनम गेटवर बंदोबस्ताला असलेल्या पोलीस हवालदार गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांना तेथे पाचारण करण्यात आले त्यांनीही दरवाजा ठोठावला व आरोळी दिली पण काहीच उपयोग होत नव्हता. त्या तरुणाने दरवाजा बंद करून नक्कीच काहीतरी बरे वाईट करून घेतले आहे अशी सर्वांची खात्री झाली. दरवाजा तोडण्याचे आम्हाला अधिकार नाहीत असे त्यांनी म्हटल्यावर सीईओ कुलदीप जंगम यांच्याशी संपर्क करण्यात आला.  सीईओ जंगम यांनी दरवाजा तोडण्यास परवानगी दिली. त्यामुळे दरवाजा तोडण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

पण तोवर पोलिसांनी दरवाज्यावर धक्के मारल्याने फरशा निखळल्या आणि दरवाजा उघडला.  आत एक तरुण निपचीत पडला होता. पोलिसांनी त्याला हलवून जागे केले. भानावर येत त्याने सुरुवातीला शौचालयात आपल्याला भोवळ आली होती, असे सांगितले. तो तरुण जिवंत असल्याचे पाहून पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. तो तरुण धाराशिवचा असून पैशाच्या व्यवहारातून दोन महिला व दोन तरुण त्याच्या पाठीमागे लागल्यामुळे तो जिल्हा परिषदेत आला व थेट तिसऱ्या मजल्यावरील महिला शौचालय गाठल्याचे चौकशीत कळाले. त्यामुळे त्याला सदर बझार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोन तास चाललेल्या या थरारामुळे जिल्हा परिषदेत गर्दी जमली होती. सर्वत्र हा चर्चेचा विषय झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button