सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सर्वशिक्षा अभियानात लेखाधिकारी म्हणून काम केलेले डॉ. वैभव रामचंद्र राऊत यांची सोलापूरचे जिल्हा कोषाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
मूळचे बार्शी तालुक्यातील रहिवासी असलेले डॉ. वैभव राऊत यांची सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातून पदोन्नतीवरून पुणे मनपाच्या स्थानिक निधी लेखापरीक्षा उपविभाग क्रमांक दोनच्या सहाय्यक संचालकपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर 11 जुलै रोजी शासनाचे अवर सचिव टी. आर. पवार यांनी वैभव राऊत यांच्या पदस्थापनेत अंशतः बदल करीत सुधारित पदस्थापना करीत असलेले आदेश जारी केले. यामध्ये डॉ. राऊत यांची सोलापूरचे जिल्हा कोषाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

More Stories
गड संवर्धनासाठी जाणाऱ्या मावळे व खासदार लंके यांचा सन्मान
सोलापूर जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन साजरा
मोहोळ- मंद्रूप – वळसंग या ८१ किमी नव्या रस्त्यासाठी ७४० कोटी निधी मंजूर