March 22, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

Wari: गुड जॉब.. आषाढीवारीत अटॅक आलेल्या १० वारकऱ्यांवर मोफत शस्त्रक्रिया

सोलापूर : यंदाच्या आषाढीवारीत सार्वजनिक आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन हृदयविकाराचा झटका आलेल्या राज्यातील दहा वारकऱ्यांचे प्राण वाचवले आहेत. महात्मा फुले आरोग्य योजनेतून या वारकऱ्यांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली.

आषाढीवारीमध्ये वारकऱ्यांना चांगली आरोग्य सेवा दिल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने व त्यांच्या टीमचा सोलापूर जिल्हा परिषद बीट पत्रकार संघातर्फे सन्मान करण्यात आला. सन्मानाला उत्तर देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माने यांनी आषाढीवारीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या कामगिरीची माहिती दिली. पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा प्रथमच पालखी मार्ग व पंढरपुरात 21 आयसीयू सुरू करण्यात आले होते. यामध्ये आयएमए बरोबरच सार्वजनिक आरोग्य विभागातील 500 डॉक्टरांनी सेवा दिली. ओपीडीचा पाच लाख 27 हजार 224 वारकऱ्यांनी लाभ घेतला. उलटी, जुलाब, ताप, कणकण असलेल्या 4 हजार 438 वारकऱ्यांना ऍडमिट करून उपचार करण्यात आले. 57 वारकरी क्रिटिकल परिस्थितीत आढळले. त्यात दहा जणांना हृदयविकाराचा झटका आला होता. या दहा जणांना पंढरपुरातील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेतून मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदय शस्त्रक्रिया केलेले हे वारकरी महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत.

गतवर्षी आषाढीवारीत तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते. यंदा मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच, सहा व सात जुलै रोजी तीनरस्ता येथे शिबिर घेण्यात आले. यात 89 हजार 213 वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली. नेत्रतपासणी करून वारकऱ्यांना मोफत चष्मे देण्यात आले. यंदा आषाढीवारीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर वारकरी आले. पालखी सोहळ्यांबरोबरही वारकऱ्यांचा मोठा सहभाग होता. आरोग्य विभागाने आजारी वारकऱ्यांची मोठी सेवा केल्याचे डॉ. माने यांनी नमूद केले. आयसीयूमुळे यंदा वारीमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झाले. मरण पावलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या घरापर्यंत सेवा देण्यात आली. आरोग्य विभागाची ही जबाबदारी यशस्वी करण्यासाठी डॉ. एस. पी. कुलकर्णी व डॉ. क्षीरसागर यांनीही परिश्रम घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांची यादी..