सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

सोलापूरच्या शालार्थ आयडीप्रकरणी औदुंबर उकिरडेसह सात जणांची डीई

सोलापूर : सोलापूरच्या शालार्थ आयडी प्रकरणात पुणे शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्यासह सोलापूरच्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. यात अडकलेल्या सात अधिकाऱ्यांच्या पगारातून 24 लाख वसूल करण्याचेही आदेश देण्यात आल्याचे  सांगण्यात आले.

शालार्थ आयडी प्रकरणात शिक्षण विभागाने मानसिक त्रास दिल्याने यलगुलवार शाळेतील शिपाई काळे यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणानंतर शिक्षण विभाग हादरले होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या प्रकरणात लक्ष घालत चौकशीचे आदेश दिले होते. काळे हे या शाळेत शिपाई असताना त्यांना सहशिक्षकाची मान्यता देण्यात आली होती. यासाठी शिक्षण विभागाने शालार्थ आयडी काढण्याबाबत त्यांचा छळ केला. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षण विभागाने यासबंधी अधिकाऱ्यांची चौकशी केली. या तत्कालीन शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्यासह सातजण दोषी आढळले आहेत. त्यामुळे या सात जणाविरुद्ध खाते न्याय चौकशी करून त्यांच्याकडून 24 लाख वसूल करण्यात यावेत असे आदेश देण्यात आले आहेत. यात सोलापुरात माध्यमिक शिक्षण विभागात काम केलेले शिक्षण अधिकारी अडकले आहेत. त्यामुळे सोलापूरचा माध्यमिक शिक्षण विभाग चौकशीच्या रडारवर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button