सोलापूर: मंद्रूप ग्रामपंचायतीकडून गावात अपेक्षित विकासकामे होत नसल्याच्या निषेधार्थ, भारतीय जनता पक्षाच्यावतीने मंद्रुप ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व इतर कुठलेही पदाधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात असलेल्या रिकाम्या खुर्च्यांना हार घालून निषेध व्यक्त केला.
मंद्रूप गावातील रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, महिला व युवकांसाठी मूलभूत सुविधा अशा अनेक विषयांवर गावकऱ्यांत नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीला योग्य त्या उपाययोजना कराव्यात यासाठी निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता.यावेळी भाजपचे प्रा. उमाशंकर राऊत, भाजपा तालुका पंचायतराज अध्यक्ष अनिल जोडमोठे, भाजपचे ओबीसी तालुका सरचिटणीस शिवपुत्र जोडमोटे, भाजप ग्रामपंचायत सदस्य दयानंद ख्याडे , मंद्रुप तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व नव्याने भाजपचे सदस्य झालेले रेवणसिद्ध मेंडगुदले, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते लक्ष्मण जकुणे व इरेश मेंडगुदले आदि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने ग्रामपंचायतीच्या उदासीन व गैरहजर प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.यावेळी निवेदन देताना प्राध्यापक उमाशंकर राऊत म्हणाले की. “ग्रामपंचायतीचा कारभार जनतेच्या हितासाठी पारदर्शक व उत्तरदायित्वपूर्ण असायला हवा. पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही त्यांची कामाबद्दलची नसणारी तळमळ व असंवेदनशीलता दिसून येत आहे.

More Stories
पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिरात झेडपी अध्यक्षांना डावलले
राज्यातील जलजीवन मिशनच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 14 कोटी 57 लक्ष निधी वितरीत
घरकुल योजनेचा प्रत्येक आठवड्याला घेणार सीईओ कुशल जैन प्रगतीचा आढावा