सोलापूरजिल्हा परिषद

पालखी मार्गावर पाणीपुरवठ्यासाठी झेडपीचा पंढरपुरात नियंत्रण कक्ष

सोलापूर : आषाढी यात्रा काळात पालखी मार्गावर वारकऱ्यांना पुरेसा पाणी पुरवठा करणेकामी पंढरपुरात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून यासाठी नियंत्रण अधिकारी व सहा. कर्मचारी यांची नियुक्ती करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जाहीर केले आहे.

जिल्हा परिषद सोलापूर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने आषाढी यात्रा पालखी मार्गावर वारकऱ्यांना पुरेसा पाणीपुरवठा करणे व त्यात काही अडचणी येऊ नये म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पंढरपूर येथे नियत्रण कक्ष स्थापन केला आहे. यासाठी एकूण 10 पालखी मार्गावरील टँकर भरण्याच्या एकूण 107 ठिकाणचा आढावा घेऊन 142 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली. या आढावाप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, उप कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, रविंद्र करजगी रणजीत घोडके व सर्व उपकार्यकारी अभियंता उपस्थित होते.

पालखी मार्गावरील एकुण नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या 142 इतकी आहे. पालखी मार्गावरील टॅंकर भरण्याचे एकूण ठिकाण  107 इतके आहेत.

पालखी मार्गनिहाय नियोजन पुढील प्रमाणे आहे.

1. संत ज्ञानेश्वर महाराज, पालखी मार्गावरील नियंत्रण:अधिकारी व कर्मचारी – 29

2. संत तुकाराम महाराज मार्गावरील पालखी नियंत्रण अधिकारी व कर्मचारी -12

3. संत सोपानकाका महाराज पालखी मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी-05

4. संत गजानन महाराज पालखी महाराज मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी – 10

5. संत मुक्ताबाई पालखी मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी – 08

6. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी – 05

7. संत एकनाथ महाराज पालखी मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी – 04

8. संत निळोबाराय महाराज पालखी मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी – 05

9. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी (पंढरपूर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर ) मार्गावरील नियंत्रण: अधिकारी व कर्मचारी – 47

10. चांगावटेश्वर महाराज मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी = 06

11. कौडण्यपूर विदर्भ पालखी मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी – 06

12. नियंत्रण कक्ष पंढरपूर येथील नियुक्त अधिकारी व कर्मचारी -. 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button