March 18, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

अभिनेता संदीप पाठक, शिवाली परब सोलापूरच्या झेडपी शाळेत रमले

सोलापूर: हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब व अभिनेता संदीप पाठक यांनी गुरुवारी मोहोळ तालुक्यातील कामती येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. शाळेतील मुलांसमोर गप्पा मारताना त्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला.

सोलापूर जिल्ह्यातील कामती खुर्द येथे ग्रामपंचायतीस हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब व अभिनेता संदीप पाठक भेट देऊन ग्रामस्थांचा उत्साह वाढविला. शाळेत मुलांबरोबर संवाद साधून बेंचवर बसून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. येथील ग्रामस्थांना मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात सहभागी होणेचे आवाहन केले. जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सहाय्यक गट विकास अधिकारी विजयकुमार देशमुख, गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक, बाल विकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, शिवराज राठोड, सरपंच सविता किरण माळी उपसरपंच दीपक काटकर, दीपक माळी दूध संघाचे व्हाईस चेअरमन मंजुश्री मनोहर कारंडे,  ग्रामपंचायत अधिकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारीवर्ग उपस्थित होते. शिवाली व संदीप यांनी मुख्यमंत्री पंचायतराज अभियानासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दौरे करून ग्रामस्थांचा उत्साह वाढविला.

सीईओ जंगम यांची गुळवंचीला भेट  मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायतराज अभियानात गुळवंची येथे  सीईओ कुलदीप जंगम यांनी भेट देऊन अभियानाच्या अंमलबजावणीबाबत ग्रामपंचायतीत चाललेल्या कामकाजाची पाहणी केली. या स्पर्धेत अधिक गुण प्राप्त करून स्पर्धात्मक अभियानामध्ये गावाचे नावलौकिक वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. ग्रामपंचायत करवसुली, जि प शाळा व गाव परिसरामध्ये सीसीटीव्ही बसवणे, शाळेची देखभाल दुरुस्ती करणे, लोकवर्गणी व कर संकलन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, थकित विज बिल भरणे अशा अनेक गोष्टीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. शाळा परिसरामध्ये रंगवण्यात आलेल्या बोलक्या भिंती, रस्त्याच्या दुतर्फा केलेली वृक्ष लागवड, अंगणवाड्यांसाठी बेबी टॉयलेट, व्हर्टिकल टाईपची नाविन्यपूर्ण परसबाग अशा अनेक चांगल्या गोष्टींच्या कौतुक केले. या भेटीवेळी गटविकास अधिकारी राजाराम भोंग, विस्तार अधिकारी तथा पालक अधिकारी सोमनाथ शिंदे, सरपंच सुनील जाधव, उपसरपंच  तांबे, ग्रामपंचायत अधिकारी मीनाक्षी सरवदे, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका,आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

तावशी  येथे अभियानाला गतीसोलापूर जिल्ह्यातील पंतप्रधान यांचेहस्ते गौरविण्यात आलेल्या तावशी ग्रामपंचायतीस गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी भेट देऊन मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. सरपंच पप्पु यादव, पंचायत अधिकारी सर्वगोड यांचेसह उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. विविध नाविन्यपूर्ण उपक्रम या ग्रामपंचायतीमध्ये राबविणेत येत आहेत.