सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालय

सोलापूरच्या कन्येचा धाराशिवमध्ये झेंडा

सोलापूर : मूळच्या सोलापूरच्या असलेल्या व सध्या धाराशिवच्या अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्याचा मान मिळवला आहे. तसेच शासनाच्या दीडशे दिवसाच्या ई गव्हर्नर सुधारणा कार्यक्रमात धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी नगर विभागात अव्वल ठरले आहे.

अक्कलकोटच्या रहिवासी असलेल्या ज्योती पाटील यांनी गेल्या वर्षभरात धाराशिव चे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसाच्या ई गव्हर्नर सुधारणा कार्यक्रमात कार्यालयीन मूल्यमापनात छत्रपती संभाजीनगर विभागात धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रथम तर राज्यात पहिल्या पाच पैकी तिसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी किरण पुजार यांच्या अथक अहोरात्र प्रयत्न व मार्गदर्शन तसेच त्याला धाराशिव जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी, मुख्यमंत्री फेलो तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एन आय सी महा आयटीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेली साथ यामुळेच हे शक्य झाल्याचे अप्पर जिल्हाधिकारी पाटील यांनी म्हटले आहे. याबद्दल धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील टीमचे त्याने अभिनंदन केले आहे.

150 दिवसाच्या ही गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या 36 सर्वोत्तम जिल्हाधिकारी कार्यालयापैकी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय 185.25 इतके गुण घेऊन छत्रपती संभाजीनगर विभागात अव्वल ठरले आहे. यामध्ये जळगाव प्रथम, ठाणे द्वितीय, धाराशिव तृतीय, लातूर चतुर्थ आणि कोल्हापूर  जिल्हाधिकारी कार्यालय पाचवे ठरले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button