सोलापूरजिल्हा परिषदसामाजिक

आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास किती आर्थिक सहाय्य मिळते?

276 जोडप्यांच्या बँक खात्यावर जमा होणार अनुदान

सोलापूर  : सामाजिक समता व समरसता निर्माण करण्याच्यादृष्टीने आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह झालेल्या दांपत्याना 50 हजार रुपये प्रति जोडपे अनुदान वितरीत करण्यात येते. सदर अनुदान विवाहित जोडप्यांच्या संयुक्त बँक खात्यावर (पीएफएमएस) PFMS प्रणालीमार्फत डीबीटीद्वारे प्रदान करण्यात येत आहे  अशी माहिती जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी दिली.

सन 2024-25 या वर्षी शासनाकडून 1 कोटी 61 लाख निधीची तरतूद प्राप्त झालेली आहे. सन 2022-23, सन 2023-24 व सन 2024-25 मधील 276 पात्र लाभार्थ्यांना 1 कोटी 38 लाख इतके अनुदान मंजूर करण्यात आले असून, लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर (पीएफएमएस) PFMS प्रणालीमार्फत डीबीटी द्वारे प्रदान करण्याची कार्यवाही सुरु आहे.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हयातील नागरीकांनी तात्काळ जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांचेकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button