सोलापूरनिवडणूक

अशी होणार झेडपी व पंचायत समितीची मतमोजणी

सोलापूर  : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–2026 ची मतमोजणी सोमवार दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत सुरू झाली असून प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांत एकूण 204 मतमोजणी टेबल उभारण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी सुरक्षा, पारदर्शकता व शिस्त राखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मतमोजणी प्रक्रियेत पोस्टल मतांची स्वतंत्र मोजणी करण्यात येत असून काही तालुक्यांत मतमोजणीच्या फेऱ्यांची संख्या जास्त असल्याने निकाल उशिरा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशी असेल तालुकानिहाय मतमोजणी व्यवस्था.

करमाळा : तहसिल कार्यालय येथील शासकीय धान्य गोदामात 16 टेबलवर 18 फेऱ्यांत मतमोजणी, पोस्टल मतांची 2 मोजणी.

माढा : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, अकुलगाव–कुडूवाडी येथे 20 टेबल, 16 फेऱ्या, पोस्टल 2.

बार्शी : उपळाई रोड शासकीय धान्य गोदामात 24 टेबल, 12 फेऱ्या, पोस्टल 2.

उत्तर सोलापूर : नुतन मराठी विद्यालय, डफरीन चौक येथे 14 टेबल, 9 फेऱ्या, पोस्टल 1.

मोहोळ : शासकीय धान्य गोदामात 20 टेबल, सर्वाधिक 24 फेऱ्या, पोस्टल 3.

पंढरपूर : कराड रोड शासकीय धान्य गोदामात मतमोजणीची व्यवस्था 16 टेबल 24 फेऱ्या पोस्टल 3.

माळशिरस : म्हसवड रोड शासकीय धान्य गोदामात 24 टेबल, 18 फेऱ्या, पोस्टल 3.

सांगोला : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन येथे 20 टेबलवर मतमोजणी.

मंगळवेढा : पंढरपूर रोड शासकीय धान्य गोदाम हॉल क्र.01 येथे 20 टेबल, 11 फेऱ्या, पोस्टल 4.

दक्षिण सोलापूर : सोरेगाव येथील शहीद राहूल शिंदे बहुउद्देशीय सभागृहात 16 टेबल, 19 फेऱ्या, पोस्टल 2.

अक्कलकोट : तहसील कार्यालय येथे 14 टेबल, 24 फेऱ्या, पोस्टल 1.

मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून उमेदवार, प्रतिनिधी व अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी सीसीटीव्ही, व्हिडिओ रेकॉर्डिंग व निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व मतमोजणी केंद्रांवर नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्यात आला असून निकाल जाहीर होताच अधिकृत माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.

राजकीय खलबत्ते वाढली…

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत चुरशीच्या लढती झाल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही ठिकाणी पहिल्याच फेरीत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असली तरी मोहोळ, अक्कलकोट, माळशिरस यांसारख्या तालुक्यांत अधिक फेऱ्या असल्याने अंतिम निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button