सोलापूर: सांगोला विद्यामंदीर प्रशालेमध्ये घडलेला दहावीच्या प्रश्नपत्रिका चोरीचा गुन्हा उघड झाला आहे. एका अल्पवयीन मुलाने हा प्रकार केला असून त्याने गुन्ह्यात वापरलेला कटर व स्कुटी पोलिसांनी जप्त केली आहे.
दि. १७ मार्च २०२६ रोजी सांगोला विद्यामंदीर प्रशालेतील कस्टडी रुममध्ये ठेवलेले इयत्ता १० वी बोर्ड परिक्षेचे पेपर कोणी तरी अज्ञात इसमाने चोरुन नेलेबाबत सांगोला पोलीस ठाणे गु.र.नं. २४५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२९ (३), ३३४, ३०५ (अ) सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणान्या गैरप्रकार प्रतिबंध करण्याबाबत अधिनीयम १९८२ चे कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. भूगोल विषयाच्या पेपरच्या आधी एक दिवस हा प्रकार घडल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.
सदर गुन्ह्याच्या अनुशंगाने तपासकामी सांगोला पोलीस ठाणेकडील वेगवेगळी शोध पथके तयार करुन रवाना करण्यात आलेली होती. सदर पथकाने गोपनीय माहितीच्या व तांत्रिक पुराव्याच्या आधारे अज्ञात आरोपीची गोपनीय माहिती काढली असता सदरचा गुन्हा एका अल्पवयीन विधी संघर्ष ग्रस्त बालकाने केल्याचे उघड झाले आहे. सदर अल्पवयीन विधी संघर्ष बालकाकडे त्यांच्या पालकाचे समक्ष सविस्तर चौकशी केली असता त्याने गुन्हा केलेबाबत कबुली दिलेली आहे. तसेच त्याने गुन्हा करते वेळी वापरलेले इलेक्ट्रीक कटर, इलेक्ट्रीक मोटारसायकल, चोरीस गेलेले इयत्ता १० वी बोर्ड परिक्षेच्या प्रश्न पत्रिका व तीन कोऱ्या उत्तर पत्रिका जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पुढे चालु आहे.
सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर,. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण,प्रितम यावलकर, अपर पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण डॉ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा, तसेच संजय जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, विनोंद घुगे, सांगोला पोलीस ठाणे यांचे आदेशान्वये सपोनि वाघे, सपोनि मोरे सांगोला पोलीस ठाणे, सपोनि विजय शिंदे, सपोनि भाऊसाहेब गोसावी स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण पोसई पुजारी, पोसई पाटील, मपोसई चव्हाण, पोहेकॉ/१८१० वाघमोडे, पोहेकॉ अस्लम काझी, पोहेकॉ वजाळे, पोहेकॉ राजगे, पोहेकॉ सावंत, पोहेकॉ प्रमोद गवळी, पोहेकॉ संतोष देवकर, पोहेकॉ/२६४ क्षीरसागर, पोहेकॉ १२२८ जाधव, पोना/८३५ लेंगरे, पोकॉ/१२६२ पाटील, पोकों मारुती पांढरे, पोकों माळी, पोकों कुंभार, पोकों राजु आवटे, पोकॉ अमोल वाडकर, पोकों रमेश सुर्यवंशी, पोना इरकर, पोकों/३३५ वाघमोडे, यांनी सदर गुन्ह्याच्य तपासामध्ये सहकार्य केले असुन अधिक तपास सपोनि मोरे हे करीत आहे.

More Stories
सोलापूर झेडपीच्या अध्यक्षपदी भाजपचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी इंद्रजीत पवार बिनविरोध
रेड कार्पेट; सोलापूर झेडपी अध्यक्ष निवडीची जय्यत तयारी
सांगोल्यात दहावीच्या भूगोलच्या पेपरची चोरी; तरीपण ठरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची परीक्षा होणार