सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

सोलापूर झेडपी शिक्षण विभागाचा “गुढीपाडवा पट वाढवा’ अभियान

सोलापूर: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या “गुढीपाडवा पटसंख्या वाढवा” या अभियानाचा शुभारंभ उत्तर सोलापूर तालुक्यातील अंबिका नगर जिल्हा परिषद शाळेत करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रप्रमुख जीवराज खोबरे यांच्याहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा लक्ष्मी कनकधर या होत्या. यावेळी उपाध्यक्ष प्रज्ञा राऊत, मुख्याध्यापक सिद्धाराम माशाळे, शिक्षिका वैशाली गोंदकर, विद्या वरडुळे,  रसिका बंदीछोडे, अंगणवाडी सेविका प्रभा जानराव उपस्थित होते. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे प्रवेश फार्म भरून त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गुलाब पुष्प व खाऊ देऊन औक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट वर सर्व नवागत विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले. विविध उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून “गुढीपाडवा पट वाढवा”या अभियानाचे महत्त्व विशद केले.यासाठी पालक व विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन शिक्षक शिवशंकर राठोड यांनी केले. उपस्थितांचे आभार शिवाजी वडते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विध्यार्थी, पालक व शाळेतील शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button