सोलापूरजिल्हा परिषद

सूर्यकांत भुजबळ यांनी दिव्यांग विभागाचा पदभार सोडला

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे जिल्हा दिव्यांग अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार असलेले ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिव्यांग विभागाचा पदभार सोडला आहे.

समाज कल्याण विभागापासून दिव्यांग सक्षमीकरण विभाग वेगळा झाल्यानंतर पहिल्यांदा या विभागाचा अतिरिक्त पदभार सुलोचना सोनवणे यांच्याकडे आला. त्यानंतर  दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी काही काळ या विभागाचा कारभार पाहिला. त्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी या विभागाचे जबाबदारी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्याकडे दिली. दिव्या विभागाच्या शाळांचे पटपडताळणी, नोंदणी तपासणी आधी जबाबदाऱ्या भुजबळ यांनी पार पाडल्या. सध्या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाची गुणवत्ता तपासणी सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील गावे तपासण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेचे पथक येत आहे तर सोलापूरचे पथक लातूर जिल्ह्यातील गावांची तपासणी करण्यासाठी जाणार आहे. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. यातून वेळ मिळणार नसल्याने जिल्हा दिव्यांग सक्षम अधिकारी या अतिरिक्त पदभारातून मुक्त करावे, असा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे आता ही जबाबदारी कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व जिल्हा दिव्यांग सक्षम अधिकारी ही दोन्ही पदे रिक्त आहेत. जिल्हा समाजकल्याण अधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे आहे. जिल्हा महिला बालकल्याण विभागाचा वाढता व्याप पाहता त्यांनीही समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार सोडण्याची तयारी केल्याचे समजते. त्यामुळे शासनाकडून या दोन्ही पदावर अधिकारी मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी आता पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button