सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे जिल्हा दिव्यांग अधिकारी म्हणून योजना शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
सध्या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाची गुणवत्ता तपासणी सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील गावे तपासण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेचे पथक येत आहे तर सोलापूरचे पथक लातूर जिल्ह्यातील गावांची तपासणी करण्यासाठी जाणार आहे. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. यातून वेळ मिळणार नसल्याने जिल्हा दिव्यांग सक्षम अधिकारी या अतिरिक्त पदभारातून मुक्त करावे, असा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडे दिला होता . जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी भुजबळ यांचा प्रस्ताव मंजूर करून जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार योजना शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. वठारे सध्या रजेवर असून सोमवारी ते या पदाचा पदभार घेतील असे सांगण्यात आले.

More Stories
अक्कलकोट: शाळेवर शिक्षणाधिकारी, विद्यार्थी हजर पण शिक्षकच गायब
सोलापूर झेडपीची विमा सुरक्षा कवच योजना राज्यभर राबविणार
सोलापुरात विड्या वळत महिलांनी ऐकली “मन की बात’