सोलापूर : कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अरुण क्षीरसागर हे 2007 पासून कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. जिल्हा परिषदेमधील सेवा काळात त्यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार आणि अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. अरुण क्षीरसागर यांनी प्रयत्न करून कास्ट्राईब संघटनेसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात कार्यालय निर्माण करून, आज ते सेवानिवृत्तीनंतरही पूर्णवेळ मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन, अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर निवड झाली. जिल्हा परिषद सर्व संवर्गीय अधिकारी कर्मचारी, मागासवर्गीय कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

More Stories
श्री सावता महाराज मंदिरासाठी जमीन खरेदी करणार तर बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी 15 एकर जागा उपलब्ध
बेकायदेशीर कामासाठी शिक्षिकेचा दबाव; माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याची पोलिसात धाव
पालकमंत्री जयकुमार गोरे “या’ कामासाठी येणार आज सोलापुरात