सोलापूरजिल्हा परिषदसंघटना-संस्थासामाजिक

निराधार दिव्यांग मुलीला सीईओ कुलदीप जंगम यांनी दिला आधार 

 

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील शिक्षक स्व. मधुकर बगाडे यांच्या दिव्यांग मुलीला निवृत्ती वेतनाचा लाभ सीईओ कुलदीप जंगम यांनी मिळवून दिला आहे.

बगाडे हे सेवेत असताना नियत वयोमानानुसार ३१ ऑगस्ट १९९४ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानां कुटुंब निवृत्ती वेतनासाठी वारस म्हणून पत्नी शालिनी मधुकर बगाडे होत्या.  त्यांना तीन मुलीच आहेत त्या पैकी एक मुलगी कमरेपासून जन्मताच अपंग आहे व दोन मुली विवाह होवून सासरी गेल्या आहेत. मधुकर बगाडे यांचा १६ ऑक्टोबर २००८ मध्ये मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नीला कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ मिळत होता. पत्नी शालिनी मधुकर बगाडे यांचाही २ऑक्टोबर २४ रोजी मृत्यू झाला. दिव्यांग असलेली मुलगी मंजुश्री मधुकर बगाडे ही निराधार झाली. दोन बहिणी जेमतेम तिला खर्चासाठी पैसे देत होते. तेवढ्याच रकमेवर १००० रूपये भाड्याने घेतलेल्या रूममध्ये ती जीवन काढत आहे. जयश्री मधुकर बगाडे हिचे निराधार जीवन बघून शेजारी राहात असलेले सेवानिवृत्त गुरूजी अजीज हिगंणीकर यांनी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले यांच्या निदर्शनास आणून कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी सांगितले

सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले, सुभाष फुलारी, काळप्पा सुतार, रमेश गायकवाड सिध्देश्वर धसाडे आदींनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे पाठपुरावा केला. जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिव्यांग मंजुश्री मधुकर बगाडे हिला २ ऑक्टोबर २०२४ पासून कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधीकारी कुलदीप जंगम यांच्याकडे शिफारस केली. या प्रस्तावाला सीईओ जंगम यांनी मंजुरी देऊन एका निराधार दिव्यांग मुलीला आधार दिला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच याबाबत सेवानिवृत्त शिक्षकात समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button