सोलापूर ग्रामीण पोलीसक्राईम

सोलापुरात मकोकामधील आरोपीने जामिनावर आल्यावर केल्या जबरी चोऱ्या, घरफोड्या

सोलापूर: मकोका गुन्हयातुन जामिनावर सुटलेला आरोपीने दोन जबरी चोरी, दोन घरफोडया करून चोरलेली मोटारसायकलसह चोरी 16.5 ग्रॅम सोने, 15 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 3 लाख 29 हजार 750 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली  सपोनि ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक फरारी आरोपींचा शोध घेणेकामी मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीत फिरत होते. पथकातील पोलीस अंमलदार अक्षय डोंगरे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, मोकामधुन जामीनावर सुटलेला आरोपी सागर सफाल्या शिंदे व त्याचा सावत्र भाउ व त्याचा आणखीण एक साथीदार असे तीघांनी मिळुन मनगोळी येथील वस्तीवरील वयोवृध्द महिलेस जिवे मारण्याची धमकी देवुन तीचे गळयातील व कानातील सोन्याचे दागिने जबरीने चोरले असुन ते दोघे सध्या अंत्रोळी फाटा येथे चोरीच्या मोटार सायकलसह थांबलेले आहेत. त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नांव व पत्ता विचारता ते उडवाउडवीचे उत्तरे देवू लागले. सपोनि ज्ञानदेव वाघ यांनी विश्वासात घेवून पोलीस असल्याचे सांगताच त्यानी त्यांची नांवे सांगितली. सागर उर्फसाग-या सफ-या उर्फ सफाल्या शिंदे (वय 29) व त्याचा सावत्र भाऊ असलेला विधीसंघर्षग्रस्त बालक (दोघे रा. जामगाव ता मोहोळ) अशी नावे निष्पन्न झाली. मिळालेल्या बातमीप्रमाणे कौशल्यपूर्ण तपास करता, त्यानी मागील 15 ते 20 दिवसापूर्वी मनगोळी शिवारातील एका वस्तीवरील वयोवृध्द महिलेस जीवे मारण्याची धमकी देवुन तिचे गळयातील व कानातील सोन्याचे दागिने जबरीने चोरले असल्याचे सांगितले. पकडलेले आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी दामाजी कारखाना रोड मंगळवेढा येथे घरातील महिलेस व मुलास धाक दाखवुन लुटल्याचा गुन्हा कबूल केला. तसेच कंदलगाव, हराळवाडी (मोहोळ) येथे एकाच रात्री 5 घरे फोडल्याचे सांगुन त्यांचे ताब्यात मिळुन आलेली युनीकार्न मोटारसायकल ही शिवाजीनगर बाळे येथुन चोरुन आणल्याचे सांगितले. त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 16.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 15 ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिने, फौजदार चावडी पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात नोंद असलेली एक युनीकॉर्न मोटार सायकल व रोख रक्कम पथकाने हस्तगत केली. पकडलेले आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेकडे अधिक तपास चालु असुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पकडलेला विधीसंघर्षग्रस्त बालक हा एकुण 16 विविध घरफोडीच्या गुन्हयात रेकॉर्डवरील पाहिजे असुन सागर शिंदे हा कामती, मंद्रुप पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात आरोपी आहे. तसेच मोहोळ पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात त्याच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट प्रलंबीत आहे. तो सध्या मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी या गावातील सन 2018 मधील खुनासह दरोडयातील मकोकामधुन जामीनावर सुटलेला आरोपी आहे. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहायक फौजदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोहेकॉ नागेश कोणदे, मोहन मनसावाले, जगदीश राठोड, पोलीस अंमलदार दिनेश पवार, अक्षय डोंगरे, ज्ञानेश्वर पाथरुट, सतिष बुरकुल, महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोटे, सुनंदा झळके यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button