सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालयसामाजिक

मंत्री संजय शिरसाट यांच्या आश्वासनामुळे समाजकल्याण ठेकेदारांचे आंदोलन मागे

सोलापूर : जिल्हा समाजकल्याण विभागातील गेल्या दोन वर्षांपासून कंत्राटदार यांनी केलेल्या कामांचा प्राप्त निधी वाटपाबाबत जिल्हा समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांचे बैठकीत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ अध्यक्ष व राज्य अभियंता संघटनेचे मिलिंद भोसले यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना डायरेक्ट फोन करून चर्चा केल्यानंतर दोन दिवसात निधी वाटप करण्याचा आदेश देणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर कंत्राटदारानी घोषित केलेले आंदोलन माघार घेतले.

सोलापूर जिल्हा समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्या दालनामध्ये महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना यांच्या शिष्टमंडळाची मंगळवारी बैठक झाली.  कंत्राटदार यांचे सन 2023-24 चे ११ कोटी व 2024-25 वर्षांमधील ५ कोटी निधी प्राप्त झालेला आहे. तरी सुद्धा कंत्राटदार यांना गेल्या पाच महिन्यांपासून हा निधी वाटप केला जात नाही. याबाबत मंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी फोनवरून आयुक्तांसमोर बैठकीत चर्चा केली. मंत्री शिरसाट यांनी दोन दिवसात निधी वाटपाबाबत आदेश देतो, असे आश्वासन राज्य अध्यक्ष भोसले यांना दिले आहे.

बुधवार दि. २४ जून रोजी सोलापूर जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांचे कार्यालयासमोर संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक यशस्वी झाली आहे. या बैठकीस कांतीलाल डुबल,कैलास लांडे,आनंद तोडकरी, नरेंद्र भोसले,विनोद चव्हाण,हेमंत जाधव,जितेश कदम,किरण गावडे,गणेश पवार ‌उपस्थित होते. मंत्र्यांच्या आश्वासनामुळे हे आंदोलन मागे घेत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button