सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून बीडहून विशाल मुळे यांची परिविक्षाधीन शिक्षणाधिकारी म्हणून स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कादर शेख यांच्या नियुक्तीचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील 13 शिक्षणाधिकाऱ्यांना नियुक्ती दिली आहे. यात 10 शिक्षणाधिकारी परिविक्षाधीन आहेत. मूळचे बीड जिल्ह्याचे असलेले विशाल मुळे यांची परिविक्षाधीन अधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पदाची 30 आठवड्याची (17.08.2026 ते 30.03.2027) या कालावधीकरिता जबाबदारी देण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी शेख यांना सोलापुरात तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी विनंती बदलीसाठी अर्जही केला होता. पण विनंती बदल्या अमान्य करण्यात आल्यामुळे ते सोलापुरातच नियुक्तीला होते. आता मुळे यांची सात महिन्यासाठी नियुक्ती करताना शेख यांच्याकडे जबाबदारी काय? हे स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांची नियुक्ती लटकली की मुळे यांचा परिविक्षाधीन कालावधी होईपर्यंत ते सोलापुरातच राहणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. योजना विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून साताऱ्याचे सुजित शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. सुलभा वठारे यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडे याचा अतिरिक्त पदभार होता. आता योजना विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाला आहे.

More Stories
टीईटी पेपरफुटी प्रकरणात सोलापूरच्या प्रकाश पवारला अटक
आमदार कल्याणशेट्टी यांच्या चालकाला पैशांची ऑफर! गोळी घाल म्हणणाऱ्या दोघांपैकी फुलारीला अटक
शाळेच्या वेळेत झेडपी शिक्षकांना शाळेतच राहावे लागणार