महाराष्ट्र

अभिनंदन..! “या’ कामासाठी मनीषा आव्हाळे, कुलदीप जंगम यांचा ग्रामविकास मंत्र्यांनी केला सन्मान

यशवंतराव चव्हाण पंचायत राज पुरस्काराचे मुंबईत थाटात वितरण

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुंबईतील एका विशेष कार्यक्रमात सन्मान केला.

यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेचा तृतीय क्रमांक आल्याबद्दल तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन/ग्रामपंचायत) स्मिता पाटील यांचा ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेंच गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्राप्त प्रदीप सकट, जगदीश मेटकरी यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

पंचायतराज अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेचा तृतीय  क्रमांक आला आहे. या काळात सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे होत्या. त्यांनी केलेल्या कामाच्या नियोजनातून हे बक्षीस मिळाल्यामुळे या कार्यक्रमाला त्यांची विशेष उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button