सोलापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी बुधवारी पदभार घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यातील गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांची अमरावतीला गटविकास तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बदली झाली होती. बदलीनंतर त्यांनी पदभारही सोडला होता. त्यामुळे प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना गटविकास अधिकारी पदावर नियुक्ती दिल्याने शेळकंदे यांनी मॅटमध्ये धाव घेतली. मॅटने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली. त्यानंतर ते जिल्हा परिषदेत हजर झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी याबाबत शासनाचा अभिप्राय घेऊन बुधवारी त्यांना पदभार दिला. शेळकंदे यांना न्याय मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

More Stories
निती आयोगाच्या डेल्टा रेकिंगमध्ये अक्कलकोट तालुका राज्यात तिसरा
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचेवतीने गुणवंत पाल्यांचा सन्मान
मुख्यमंत्री फडणवीस, प्रशांत परिचारक यांच्या अभिनंदनचा ठराव