क्राईम

सोलापुरात लाच घेण्यासाठी फौजदाराने अशी लढवली शक्कल

ट्रिपलसीट जाणाऱ्याला कोंडीत पकडून ऑनलाइन दंडात मारला काटा

सोलापूर : शहर वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत असलेल्या फौजदाराने मोटरसायकलवर ट्रिपल सीट जाणाऱ्याला पकडून 2700 रुपयाची मागणी करून 700 रुपये ऑनलाईन दंड आकारून 2 हजार रूपये खिशात घालणाऱ्या फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी गुरुवारी रंगेहात पकडले आहे.
श्रीकांत बलभीम जाधव असे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या फौजदाराचे नाव आहे.

यातील तक्रारदाराचे भाऊ हे दि. १० ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरातून त्यांच्या मोटरसायकलवरुन ट्रीपलसीट प्रवास करीत असताना फौजदार श्रीकांत जाधव यांनी शहरातील जोडबसवन्ना चौक येथे अडवून त्यांच्याकडील मोटरसायकल काढून शहर वाहतूक शाखा, उत्तर येथे आणून जमा केली. त्यानंतर तक्रारदार मोटारसायकल सोडण्याकरीता फौजदार श्रीकांत जाधव यांना भेटले असता जाधव यांनी तक्रारदारास २,७०० रुपये मागितले. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधला व ठरल्यानुसार पैसे दिले. त्यापैकी ७०० रुपये दंडाची ऑनलाईन पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरीत २ हजार रुपये खिशात घातले. यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने फौजदार जाधव रंगेहाथ पकडले आले असून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button