सोलापूर : मार्चअखेर होत असताना जलजीवनच्या ठेकेदारांना आनंदाची बातमी आहे. शासनाने बिले अदा करण्यासाठी 23 कोटी रुपये झेडपीच्या तिजोरीत जमा केले आहेत.
जिल्हा परिषदेत मार्च अखेरची लगबग अजून सुरूच आहे. जिल्हा परिषदेने केलेल्या विकास कामांचा निधी मार्च अखेर जास्तीत जास्त मिळावा ही अपेक्षा असते. लाडकी बहीण योजनेला निधी मोठ्या प्रमाणात वळविण्यात आल्यामुळे ठेकेदारांची ओरड सुरू होती. जलजीवन च्या कामाला सुमारे 55 कोटीचा निधी आवश्यक होता. पण गेल्या महिन्यात केवळ नऊ कोटी झेडपीच्या तिजोरीत आले होते. टंचाई क्षेत्रात काम केलेल्या प्राधान्य द्यावे अशी शासनाने घातली होती. या अटीनुसार बिले अदा करताना प्रशासनाला बरीच अडचण झाली. आता नव्याने पुन्हा 23 कोटी आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी विभागाची बैठक घेऊन पूर्वीप्रमाणे बिले अदा करण्यात यावीत अशा सूचना कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे नियोजन करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता धनशेट्टी यांनी सांगितले. आपली थकीत बिले मिळावेत म्हणून सोमवारी जलजीवनच्या ठेकेदारांनी जिल्हा परिषदेत मोठी गर्दी केली होती. आपला नंबर लागावा व आपले पूर्ण बिल मिळावे यासाठी ठेकेदार आग्रही असल्याचे दिसून आले.

More Stories
निती आयोगाच्या डेल्टा रेकिंगमध्ये अक्कलकोट तालुका राज्यात तिसरा
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचेवतीने गुणवंत पाल्यांचा सन्मान
मुख्यमंत्री फडणवीस, प्रशांत परिचारक यांच्या अभिनंदनचा ठराव