सोलापूर : एमआयएमतर्फे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. अक्कलकोटरोड एमआयडीसीतील आग दुर्घटनाप्रकरणी मदत कार्यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व आगीच्या मोठ्या घटना टाळण्यासाठी महापालिकेने ड्रोन खरेदी करावी अशी मागणी करण्यात आली.
अक्कलकोटरोड एमआयडीसीतील सेंट्रल टॉवेल टेक्सटाइल कारखान्याला लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला. या लोकांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी व अग्निशामक दलामधील आवश्यक लागणाऱ्या ड्रोन व इतर सुरक्षात्मक साहित्याची तात्काळ खरेदी करावी अशी मागणी करण्यात आली. यामध्ये बीए सीट, जम्पिंग शीट, पाण्याच्या गाड्या वाढवण्यासंदर्भात आणि आकाशामधून ड्रोनद्वारे co2 फवारणी करण्याची यंत्रणा उभी करावी, जेणेकरून आगीवर लवकर नियंत्रण मिळवता येईल अशा अनेक सूचना आयुक्तांना देण्यात आल्या.यावेळी माजी नगरसेवक तौफिक हतुरे,शौकत पठाण, वाहिद भंडाले, नदीम डोणगावकर, सादिक नदाफ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की