सोलापूर: राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेचे (नीट) सोलापूरातील विविध केंद्रांवर नियोजन करण्यात आले होते. ही परिक्षा सुरळीतपणे पार पडते आहे, याची तपासणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केली.
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप उपस्थित होते. यावेळी परिक्षा केंद्रावरील कंट्रोल रूम, परिक्षा दालन यासह परिक्षार्थींसाठी करण्यात आलेल्या सर्व सुविधांची पाहणी कुशल जैन यांनी केली. हरीभाई देवकरण हायस्कूल, पानगल हायस्कूल, सिद्धेश्वर प्रशाला, संगमेश्वर महाविद्यालय यासह परिक्षा केंद्रांना भेटी देऊन सविस्तर आढावा घेतला. सोलापुरात 15 केंद्रावर या परीक्षा झाल्या. परिक्षेसाठी 5691 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता त्यापैकी 5566 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 125 विद्यार्थी गैरहजर होते. सीईओ जैन यांनी नेहरू वस्तीगृह, शेळगीतील मुलींचे वस्तीगृह येथेही भेट देऊन सुविधांची माहिती घेतली.

More Stories
सोलापूरचा बारावीचा निकाल 87%; कॉपीमुक्त अभियानाचा दिसला प्रभाव
बोरामणीत तलवारीने वार करून माय लेकरांसह तिघांचा खून
गड संवर्धनासाठी जाणाऱ्या मावळे व खासदार लंके यांचा सन्मान