May 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

पालकमंत्री जयकुमार गोरे “या’ कामासाठी येणार आज सोलापुरात

सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोमवार दिनांक 11 मे रोजी सोलापुरात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून त्यांचा अधिकृत दौरा जाहीर झाला नसला तरी दोन दिवसापूर्वीच याबाबत पूर्व सूचना देण्यात आल्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीसाठी तयारीला लागली आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे हे 11 मे रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याची पूर्व सूचना दोन दिवसांपर्वीच जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीच्या तयारीत असल्याचे दोन दिवसापासून चित्र दिसून आले. पालकमंत्री गोरे हे सोमवारी महत्त्वाच्या कामासाठी दौऱ्यावर येत असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले आहे. त्यामुळे या दौऱ्यात त्यांनी जिल्हा नियोजन सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या विषयावर ही बैठक असणार आहे. यामध्ये मंगळवेढा येथील श्री बसवेश्वर यांच्या स्मारकाचे काम व आरण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी मंजूर झालेल्या निधी खर्चाबाबत करावयात येणाऱ्या कामांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठा निधी मंजूर झाला आहे. हे काम जिल्हा परिषदेकडे देण्यात आले आहे. त्यामुळे या कामाच्या पुढील प्रगतीबाबत आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे या कामाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या प्रक्रियांची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने मोठी तयारी केली आहे.

या दोन महत्त्वाच्या विषयाबरोबरच जिल्हा परिषद सदस्यांसाठी मंजूर झालेल्या निधीबाबतही चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीनंतर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमवेतही पालकमंत्री गोरे हे चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. या महिना अखेर जिल्हा नियोजनची सभा घेऊन उर्वरित कामांच्या खर्चासाठी मंजूर या दिल्या जाणार आहेत. त्यामुळे कोणत्या कामासाठी किती निधी द्यायचा याबाबत या प्राथमिक बैठकीत चर्चा होणार आहे. त्याचबरोबर आषाढी यात्रेच्या तयारीच आहे आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांना पहिल्यांदाच विकास कामासाठी निधी मिळणार असल्यामुळे पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत सोमवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्र्यांच दौऱ्यामुळे सोमवारी कामाचा दिवस असूनही अधिकारी बैठकीत गुंतणार असल्यामुळे झेडपीमध्ये शुकशुकाट जाणवणार आहे.