सोलापूरजिल्हा परिषद

अध्यक्ष दीपक वैद्य एसटीने तर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार ईव्हीने येणार झेडपीला

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या अहवाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषद मधील सर्व सन्माननीय पदाधिकारी/ अधिकारी व कर्मचारी दर सोमवारी नो वेहिकल डे साजरा करतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी दिली.

आखाती देशातील युध्दजन्य परिस्थिती तसेच जागतिक तापमान वाढ आणि वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा आणि शास्वत जीवनशैलीचा अवलंब करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत देशातील नागरिकांना आवाहन केले आहे. या आव्हानाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषद परिषदच्यावतीने विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. पर्यावरणाचे रक्षण करणे व इंधन वाचवण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दर सोमवार हा दिवस नो व्हेईकल डे म्हणून घोषित करण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून सोलापूर जिल्हा परिषदमधील सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येक सोमवारी खालील सूचनांचे पालन करणे अनिवार्य राहील.

नो व्हेईकल डे दिवशी सर्व पदाधिकारी/ अधिकारी कर्मचारी यांनी आपली खाजगी दुचाकी किंवा चार चाकी वाहने कार्यालयात आणू नयेत. खाजगी तसेच शासकीय वाहनांचा वापर टाळण्यात यावा. पर्यायी प्रवासाचा वापर कार्यालयात येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बस, सायकल, इलेक्ट्रीक वाहन किंवा पायी येण्यास प्राधान्य द्यावे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आवाहनाला आपली जबाबदारी ओळखून या विधायक उपक्रमाला आपण सर्वांचे उत्स्फूर्त सहकार्य मिळेल अशी खात्री आहे, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वैद्य यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती अखत्यारीतील सर्व कर्मचारी मिळून देशहितासाठी छोटेसे योगदान देण्यात सोलापूर जिल्हा परिषद राज्यात पहिली ठरली आहे.

पदाधिकाऱ्यांचा असा प्रवास…

सोलापूर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी इंधन बचतीसाठी नो व्हेइकल डे ची संकल्पना जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागातून पदाधिकारी झेडपी ला कसे येणार याबाबत लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामीण भागातून पदाधिकारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व ईवी वाहनांचा वापर करतील असे सांगण्यात आले आहे. या खुद्द जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य बार्शीहून एसटीने तर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार हे जुळे सोलापुरातून टीव्ही स्कूटर वरून जिल्हा परिषदेला येतील असे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वीही असा प्रयत्न झाला होता. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोट घालून सायकलवरून जिल्हा परिषदेत आले होते. माध्यमांसाठी हा चर्चेचा विषय झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button