सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

दिव्यांग कल्याण आयुक्त सत्यजित बडे सोलापूरच्या दौऱ्यावर

सोलापूर : तुकाराम मुंढे यांच्यानंतर दिव्यांग कल्याण आयुक्त म्हणून पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सत्यजित बडे हे सोलापूर, धाराशिव आणि लातूरच्या दौऱ्यावर येत आहेत.

दिव्यांग कल्याण विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयुक्त सत्यजित बडे यांनी खरोखरच दिव्यांग कल्याण योजनांची अंमलबजावणी कितपत होत आहे याचा आढावा घेणे सुरू केले आहे. मुंडे यांच्या काळात निघालेल्या वादग्रस्त निर्णयाची पडताळणीही त्यांनी सुरू केली आहे. याबाबत त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतल्यामुळे दिव्यांग कल्याण योजना अंमलबजावणीला गती मिळाल्याची चर्चा आहे. 30 मे रोजी धाराशिव येथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होत आहे. लातूर नंतर एक जून रोजी ते सोलापुरात येणार आहेत. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेएन व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या उपस्थितीत बैठका होणार आहेत. त्याचबरोबर दिव्यांग शाळांच्या मुख्याध्यापकांची ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण आयुक्त बडे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार आढावा बैठकांची तयारी करण्यात आल्याची माहिती सहाय्यक दिव्यांग कल्याण अधिकारी सुलभा वटारे यांनी दिली. खालील विषयावर आढावा घेतला जाणार आहे.

दिव्यांगाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणेकरिता  सत्यजीत बडे (भाप्रसे) आयुक्त दिव्यांग सक्षमिकरण हे दि. 01जून रोजी सकाळी 10.30 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह जि.प. सोलापूर येथे दिव्यांगाच्या विशेष शाळा/ कार्यशाळा/ बौध्दीक अक्षम बालगृहातील मुख्याध्यापकांची आढावा बैठक घेणार आहेत. यामध्ये १. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या कामकाजाबाबत वार्षिक नियोजन. २. युडायस मधील १००% विद्यार्थ्यांची अद्ययावत आधार अपडेट सांखिकी माहिती.३. पदमंजूरी प्रमाणे मंजूर कर्मचारी संख्या, भरलेले कर्मचारी संख्या व सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय मान्यता प्रत.तसेच रिक्त कर्मचारी संख्याची अचूक माहिती घेणे. ४. बिंदू नामावली नोंदवही छायांकित प्रत, शिल्लक असलेले अनुशेष, अद्ययावत बिंदू नामावली आणि बिंदू नामावली नोंदवही ठेवले नसल्यास त्याची कारणे.५. संस्थेत सध्या कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांचे यादी. (नांव, पत्ता, व्यवसाय इ.) व धर्मादाय आयुक्त यांचेकडील परिशिष्ठ अ ची छायाकिंत प्रत. ५. दिनांक ३१ मे २०२६ अखेर सेवानिवृत्त होणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यादी. ६. सन २०२४-२५ वर आधारित मूल्यनिर्धारण नस्ती ज्यानी दिनांक ३१ ऑगष्ट २०२५ पूर्वी सादर केले नसतील त्यांनी मूळ लेखापरिक्षण अहवालासह प्रस्ताव सादर करावे. ७. न्यायालयीन प्रकरणाची माहिती व माहिती अधिकार प्रकरणे. ८. वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रस्ताव, प्रलंबित प्रकरणाची माहिती व प्रलंबित नसलेबाबतचे प्रमाणपत्र. ९. समायोजन कर्मचाऱ्यांचे माहिती व यादी. १०. १८ वर्षावरील १००% प्रवेशितांना जवळच्या कार्यशाळेत प्रवेश दिल्याची माहिती व पुनवर्सन केलेल्या विद्याथ्यांची सन २०२५-२६ मधील यादी. ११. शाळा मधिल उल्लेखनिय बाबी व कामकाज.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button