सोलापूरआरोग्यजिल्हा परिषद

सोलापूर झेडपी अध्यक्ष वैद्य ॲक्शन मोडवर; डीएचओ कोपूरवाड यांचे टेन्शन वाढले

सोलापूर : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दोन दिवसावर येऊन ठेपली असतानाच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांचे टेन्शन वाढले आहे. झेडपी अध्यक्ष दीपक वैद्य हे ॲक्शन मोडवर असून कारवाई टाळण्यासाठी डॉ. कोपूरवाड यांनी सोमवारी त्यांच्या केबिनमध्ये ठिय्या मारला होता.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा गेल्या आठवड्यात पार पडली. या सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड हे गैरहजर होते. आषाढी वारी नंतरची ही महत्त्वाची सभा असल्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी सर्व विभाग प्रमुखांना सभेला हजर राहण्याचे आदेश दिले होते. अशात डीएचओ कोपूरवाड यांनी पुण्याच्या बैठकीचे निमित्त सांगून सभेला गैरहजर राहण्याची परवानगी अध्यक्ष वैद्य यांच्याकडे मागितली. पण सभेपुढील विषयाचे गांभीर्य पाहता अध्यक्ष वैद्य यांनी त्यांना पुण्याला जाण्यासाठी रजा मंजूर केली नाही. स्थायी समितीला कोणत्याही परिस्थितीत हजर राहण्याचे त्यांनी आदेश दिले. असे असतानाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा आदेश डावलून डॉक्टर कोपरवाड यांनी स्थायी सभेला दांडी मारली. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकाची बदली, मुख्य औषध भंडारातील फार्मासिस पुजारी यांची बोगस प्रमाणपत्रावर नियुक्ती, पानगाव आरोग्य केंद्राला काळे असल्यामुळे अपघातातील जखमीला वेळेवर उपचार मिळू शकला नाही, लेखापालासी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घातलेला वाद असे अनेक विषय प्रलंबित आहेत. फार्मासिस्ट पुजारी यांनी औषधाचे टेंडर काढताना लाखाचे बारा लाख केल्याने टेंडर रद्द करावे लागले. त्यामुळे अध्यक्ष दीपक वैद्य संतप्त झाले. स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी दहा कोटीच्या औषधाच्या खरेदीचा प्रश्न उपस्थित केला. इतकी मोठी औषध खरेदी असताना आणलेले औषधे कोठे ठेवले? असेही सवाल उपस्थित झाले. सदस्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी वद्य यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

अशात आता सर्वसाधारण सभेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वसाधारण सभेसमोर हा विषय आला तर डीएचओ पपूरवाड यांच्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी त्यांनी अध्यक्ष वैद्य यांच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी त्यांनी अध्यक्ष वैद यांच्या कार्यालयात ठेया मारला होता. अध्यक्षांनी कारवाई करू नये म्हणून आरोग्य सभापती केदार यांच्याकडेही त्यांनी लक्ष वेधल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिक्षण समितीची बैठक झाल्यानंतर सभापती केदार यांनी अध्यक्षांच्या केबिनकडे धाव घेतली. यावेळी तेथे डॉक्टर कोपरवाड उपस्थित होते. या तिघांमध्ये काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. पण अध्यक्ष वैद्य हे सध्या ॲक्शन मोडवर असल्यामुळे डॉ. कोपूरवाड यांचे टेन्शन वाढले असल्याचे कर्मचाऱ्यांमधून बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button