सोलापूर : सेवानिवृत्तीला काही महिने उरलेले असतानाच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मुख्यालय मेडिकल स्टोअरचे फार्मासिस्ट प्रवीण सोळंकी यांना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री अनुप्रिया पटेल यांच्याहस्ते ‘बेस्ट फार्मासिस्ट” चा पुरस्कार मिळाला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील फार्मासिस्ट प्रवीण सोळंकी यांना ‘बेस्ट फार्मासिस्ट” चा पुरस्कार केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्याहस्ते मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नवराष्ट्र न्यूज ग्रुपतर्फे मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आयोजित शानदार समारंभात प्रवीण सोळंकी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, उत्तर प्रदेशचे तंत्रशिक्षण मंत्री आशिष पटेल, मेगासे संस्थेच्या संस्थापक सीमा सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात प्रवीण सोळंकी यांची कामगिरी उत्तम राहिली आहे. मोडनिंब, कोंडी व औराद येथील आरोग्य केंद्राच्या मेडिकल स्टोअरमध्ये फार्मासिस्ट म्हणून त्यांनी चांगली सेवा बजावली. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मुख्यालयाच्या स्टोअरची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. कोरोना महामारी व पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या काळात त्यांनी चांगली सेवा बजावली आहे. जिल्हा प्रशासनाने याबद्दल त्यांचा वेळोवेळी सन्मानही केला आहे. याची दखल घेत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्याहस्ते सोळंकी यांना ‘बेस्ट फार्मसीस्ट” हा पुरस्कार देण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे आरोग्य विभागातून कौतुक होत आहे.

More Stories
माढा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फलोत्पादन मंत्री गोगावले यांच्याकडून पाहणी
सोलापुरात रमजान ईद उत्साहाने साजरी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सोलापुरात आध्यात्मिक मानवंदना