सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

प्राथमिक शिक्षणाधिकारी शेख यांची तत्परता; 20% टप्पा अनुदानासाठी लावला कॅम्प

सोलापूर : जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या नियोजनाचे कौतुक होत आहे. शासनाने जिल्ह्यातील खाजगी शाळांसाठी 20% टप्पा अनुदान मंजूर केले आहे. यातील शाळा व तुकड्यांमधील कर्मचाऱ्यांना वाढीव अनुदानाचे आदेश वितरित करणे व त्यांच्याकडून प्रस्ताव घेण्यासाठी शिक्षणाधिकारी शेख यांनी 19 सप्टेंबर रोजी स्काऊट गाईड कार्यालयात शिबिराचे आयोजन केले आहे.

वाढीव 20% टप्पा अनुदान मंजूर झाल्यानंतर पात्र शाळा व तुकड्यांसाठी या आदेशाचे वितरण व पात्र कर्मचाऱ्यांकडून प्रस्ताव घेण्यासाठी गोंधळ उडाल्याचा यापूर्वीचा अनुभव आहे. हे काम व्यवस्थित व पारदर्शकपणे होण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी खास शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात पात्र शाळांकडून असे प्रस्ताव घेण्यासाठी चार पथकांचे नियुक्ती केले असून पथक प्रमुख व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून प्रस्तावाच्या फायली तपासून एकाच टप्प्यात हे काम उरकण्याचे धोरण हाती घेतले आहे. पाचवे पथक मनपा शिक्षण मंडळाचे असणार आहे. याची जबाबदारी वरिष्ठ लिपिक मल्लिकार्जुन हिरेमठ यांच्यावर देण्यात आली आहे. तर प्राथमिक शिक्षण मंडळाचे पथक खालील प्रमाणे कार्यरत राहणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केलेल्या या नियोजनाचे शाळांनी स्वागत केले आहे.

असे राहील शिबिरातील पथक…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button