सोलापूर : माध्यमिक शिक्षण विभागातर्फे पंढरपुरातील यशवंत विद्यालयात संच मान्यता 2024-25 नुसार सुरु असलेल्या असिरिक्त शिक्षक समायोजन कॅम्पला उपस्थित असलेल्या शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी बुद्धिमान उन्हाळी शिबिराला भेट दिली व शिबिरात सहभागी असलेल्या मुलींना मार्गदर्शन केले.
रयत शिक्षण संस्थेचा जिल्यातील विविध शाळांतील दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळे बुद्धिमान वर्गास सुरुवात करण्यात आली आहे. या वर्गात 87 मुले शिकत असून त्यात 67 मुलींचा सहभाग आहे. मुलांपेक्षा मुलींमध्ये शिकून मोठे होण्याची उत्कंठा जादा असल्याने या वर्गाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे संयोजकांनी सांगितले.कमवा व शिका या पद्धतीच्या या निवासी शिबिराचे आयोजन करणाऱ्या मुख्याधापक व शिक्षकवृंदाचे शिक्षणाधिकारी जगताप यांनी अभिनंदन केले. शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना उज्वल भवितव्यासाठी काय काय करावे याबाबत मार्गदर्शन केले.
संच मान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांसाठी बार्शीनंतर पंढरपूर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सोलापुरात ही असे शिबिर होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी जगताप यांनी दिली आणि करा

More Stories
सोलापूरची ६० वर्षांची प्रतीक्षा संपली; सोलापूरकरांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची भेट
जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर
सोलापूर झेडपीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलल्या